Ads

Pati patni jokes in Marathi | पती पत्नी विनोद | पती पत्नी जोक्स

Pati patni jokes in Marathi | पती पत्नी विनोद | पती पत्नी जोक्स



1.

मन्या भाय शेर मारतोय अर्ज करा.


तुला थोडा भाव काय दिला.

तु तर दारु वाणीच माजली.

मला रात्रभर जाग ठेऊन.

तु मात्र ढोरावाणीच झोपली.


आता मन्या भाई नाय ऐकणार.

कारण आता माझी सटकली.

ये चल साईड ला हो.

आज पासुन आपण तुला सोडुन तुझ्या बाजुवाली पटवली.


कस भाई म्हणतील तस.




2.

रिक्षावाला - बोला साहेब , कुठे जाणार ?


गंपू - नवी मुंबईला.

रिक्षावाला- पण साहेब , कोणत्या क्लासने जायचं ते सांगा.


गंपू - आं...रेल्वेतला , विमानातला क्लास माहितीय. पण रिक्षातक्लास म्हणजे काय ?


रिक्षावाला - फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे चुकवून रिक्षा चालवणार. सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून रिक्षा चालवणार.


... गंपू - आणि थर्ड क्लास ?


रिक्षावाला - थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची...!



3.

एकदा एक मारवाडी रेल्वेने प्रवास करत होता. गाडीत त्याच्या समोर एक चिनी माणुस येऊन बसला. काही वेळाने त्या चिनी माणसाला एक डास चावायला लागला. त्याने तो डास मारला व खाऊन टाकला.


थोड्या वेळाने त्या मारवाडी माणसाच्या हातावर पण एक डास बसला. मारवाड्याने तो डास पकडला व त्या चिनी माणसाला विचारले," विकत घेतोस का ?"



4.

एकदा एक दारूड्यांचा घोळका रस्त्यावर चाललेला असतो.


वाटेतील एका घराचे दार वाजवून त्यापैकी एकजण दारात

उभ्या असलेल्या महिलेला विचारतो ,

‘सखारामाचं घर हेच

का ?’

‘होय ‘ ती महिला उत्तरते.

‘मग आमच्यापैकी सखाराम कोण आहे ते ओळखून त्याला घरात

घ्या.




5.

रिक्षावाला – 50 रुपये झाले


जोशी – हे घे 25 रुपये


रिक्षावाला – हि काय दादागिरी


जोशी – बरोबर आहे .

तु पण आलास ना रिक्षात बसुन

मग काय तुझ भाड मिच भरू?



6.

एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडत नाही!!!

एका मिञाने विचारल- तु हे कस काय शक्य केल ??


नवरा- आम्ही शिमला ला फिरायला गेलो होतो, घोडेस्वारी करताना माझी ...


7.

लग्न झाल्यानंतर कालांतराने बायको बायकोत

झालेला बदल..

:

पहिल्या वर्षी : मी म्हणते आता जेवून घ्या… किती वेळ

झाला तुम्ही काही खाल्लपण नाहीये

.

दुसर्या वर्षी : अहो, जेवण तयार आहे वाढू का ?

.

तिसर्या वर्षी : जेवण तयार आहे..

जेंव्हा तुमची इच्छा असेल तेंव्हा खा

.

चौथ्या वर्षी : जेवण तयार आहे, मी बाजारात जात आहे,

स्वतःच्या हाताने घ्या

.पाचव्या वर्षी : आज माझ्याकडून जेवण नाही बनणार…

बाहेरच काही खाऊन घ्या

.

सहाव्या वर्षी : जेंव्हा बघू तेंव्हा खाणं…खाणं…खाणं…

आत्ताच तर नाष्टा हादडलाा …


8.

काका : कारे गोट्या आई कशी आहे ?


गोट्या : आई बरी आहे


काका : दादा कसा आहे ?


गोट्या : दादा बरा आहे


काका : ताई कशी आहे ?


गोट्या : ताई बरी आहे


काका : आणि तू कसा आहेस ?


गोट्या : काका मी पण बरा आहे


काका : मग बाबा पण बरेच असतील ?


गोट्या : नाही बाबा एकच आहे





9.

ओप्रेशन टेबल वरचा पेशंट खुप घाबरत होता...


घाबरला काय? डोक्टरन विचारल..


हो. ना.. पहिलीच वेळ आहे... तो म्हणाला..


घाबरू नकोस.. माझी पण पहीली वेळ आहे....डोक्टर म्हणाल



10.

मित्र बिस्कीटा प्रमाणे असतात. ---"हक से मांगो"

.

.

.

गर्लफ्रेंड कोल्ड्रींक सारखी असते.----" ये दिल मांगे मोर"

.

.

.

बायको औषधासारखी असते.--- "बस एक ही काफी है."



11.

पाऊस आलाय….थोडी पिऊन घ्या


थोडा बियरचा गंध घ्या

थोडा चकन्याचा छंद घ्या

उरात भरून आनंद घ्या..

आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या


बघा बियर बार उसळतोय

वारा दारु घुसळतोय

तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..

आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या


सर्दी पडसे रोजचेच..

त्याला औषध तेच तेच..

प्यायचेच आहेत नंतर काढे ,

आधी अमृत पिऊन घ्या..

आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या


बघा निसर्ग बहरलाय

गारव्याने देहही शहारलाय

मनही थोडं मोहरून घ्या..

आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या



Tags : Pati patni jokes in Marathi,पती पत्नी विनोद,पती पत्नी जोक्स

Post a Comment

0 Comments