Ads

मराठी उखाणे लग्नातील | Marathi Ukhane | मराठी उखाणे | Marathi Ukhane For Female And Male Marathi143u

मराठी उखाणे लग्नातील  | Marathi Ukhane | मराठी उखाणे | Marathi Ukhane For Female And Male Marathi143u




वड्यात वडा बटाटावडा,
....मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा



केळे देते सोलून पेरू देते चोरून,
........रावांच्या जीवावर कुंकू लावते कोरून


सोन्याचे मंगळ्सुत्र सोनाराने घडविले,
--- रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी अडविले.


कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार...
आमुकरावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार!!!




साठ्यांची बिस्किटे ,बेदेकारंचा मसाला,
........नाव घ्यायला आग्रह कशाला


काही शब्द येतात ओठातून
काही येतात गळ्यातून
राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून


झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो --- - --- ची जोडी


मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११, घराला लावलि घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी


एक दिवा दोन वाती
एक शिंपला दोन मोती
अशीच राहु दे माझी व ...रावांची प्रेम ज्योती.....



सूपभर सुपारी निवडू कशी,
गळ्यात माळ वाकु कशी,
पायात पैंजण चालू कशी,
........ बसले मित्रपाशी,
कपाटाची चावी मागू कशी..?



एक होती चिऊ एक होती काऊ,
....रावांचे नाम घेते काय काय खाऊ



निळ्या निळ्या आकाशात शोभुन दिसतात चंद्र-तारे;
....रावांच्या संगतिने उजलेल् माझे जिवन सारे




राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा
... च नाव घेते अशिर्वाद द्यावा सौभाग्याचा



आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास
-- ला भरविते जिलेबिचा घास



बंगलौर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ.
घास घालतो .........बोट नको चाउस



लग्नात्त लागतात हार आणी तुरे
.... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे



सखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड
...चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड



फुलासंगे मातीस सुवास लागे,
.... नि माझे जन्मोजन्मिचे धागे.



रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास,
------ ना भरवते मी श्रीखण्ड-पुरीचा घास




चंदनी पानात मुग्ध कळी हसली
...रावांच्या प्रेमात मी नकळत फसली




गावठी गुलाबाला सुगंधी सुवास,
.....ना भरवते मी श्रिखंड-पुरीचा घास




गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
----- नाव घेते सोडा माझी वाट




नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
.....च नाव आहे लाख रुपये तोळा





सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न,
....च्या सोबत झाले आताच माझे लग्न




संसाराचे गोड स्वप्न आजवर मी पाहिले,
प्रत्यक्षात ...... चे आज मी जीवनसाथी झाले.




कामाची सुरवात होते श्रीगणेशापासुंन
........नाव घेयला सुरवात केली आजपासून




मनोकामना झाल्या सफल, आकांक्षांची होईल पूर्ती,
....रावांना मिळो तुमच्या आशीर्वादाने कीर्ती




रुपेरी सागरावर चंदेरी लाट, ---रावानच नाव घेते सोडा माझी वाट




पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
.... आहेत आमचे फार नाजुक.




गोरया गोरया हातावर रेखाटली मी सुबक मेंदी,
....चे नाव घेण्याची वारंवार येवो संधी




आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास
-- ला भरविते जिलेबिचा घास



हिरवा शालू लेवुनि येतो श्रावण महिना,
.... हाच माझा खरा दगिना.



मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर .......रावांनी दिला सौभाग्याचा आहेर.



नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू
.... चे नाव घ्यायला मी कशाला लाजू



निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
....रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास



प्रत्येक क्षण येतो अनुभव घेऊन आगळा,
....नी लाडु खावा एक सोबत सगळा



दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो ..... रावान् चा पठ्ठा




द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
...चे नाव घेते राखते तुमचा मान




जाईजुईचा वेल पस्ररला दाट
...बरोबर बान्धलि जिवनाचि गाठ




पाव शेर रवा पाव शेर खवा
.... चे नाव घेते हजार रुपये थेवा.




परसात अंगण अंगणात तुळस
----- नाव घ्यायचा मला नाही आळस




इंग्लीश मध्ये पाण्याला म्हणतात वॉटर
...... नाव घेते .... ची सिस्टर




साडीत साडी परागची साडी...
अमुकरावांना बाबानी दिली मारुतीची गाडी!!!




ताजमहाल बान्धायला कारागिर होते कुशल
----रावान्च नाव घेते तुमच्यासाथि स्पेशल




संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती
देवा सुखी ठेव ------- ची जोडी




चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप
--- रावां समवेत ओलांडते माप



चांन्दिच्या त्ताटात अगरबत्तिचा पुडा
......... च्या नावाने भरला हिरवा चुडा



जेजुरीचा खन्डोबा तुळ्जापुरची भवानी
....रावाची आहे मी अर्धागीनी




दही,साखर,तुप
...राव माला आवडतात खुप




काचेच्या बशित बदामचा हलवा
.......रावाचे नाव घेते सासुबाईंना बोलवा



आंब्यात आंबा हापुस आंबा
---- चे नाव घेते तुम्हि थोड थांबा.




मराठी उखाणे लग्नातील  | Marathi Ukhane | मराठी उखाणे | Marathi Ukhane For Female And Male Marathi143u
Ukhane in marathi

Post a Comment

0 Comments